शहापूरच्या इंग्रजी शाळेत विद्यार्थिनींची निर्वस्त्र तपासणी! मासिक पाळीच्या संशयाने शिक्षिकांनी केले घाणेरडी कृत्य
शहापूर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीच्या नावाखाली विद्यार्थिनींच्या प्रतिष्ठेस धक्का देणारा भीषण प्रकार घडला. शाळेच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवर रक्ताचे डाग दिसल्याच्या बहाण्यात शिक्षिकांनी दहा ते बारा विद्यार्थिनींना निर्वस्त्र करून तपासणी केल्याचे आरोप आहे. ही तपासणी करण्यासाठी शाळेतील महिला मदतनीस लावली गेली, अशी तक्रार पालकांनी केली आहे. या घटनेनंतर पालकांचा राग भडकला आणि त्यांनी मुख्याध्यापिकेचा…