aaplanews

मुकुल देव याचे 54 व्या वर्षी निधन

सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता मुकुल देव याचे शनिवारी नवी दिल्ली येथे 54 व्या वर्षी निधन झाले. त्याने सिने जगात  आणि टेलिव्हिजन दोन्ही ठिकाणी मोठे योगदान दिले आहे. या बातमी मुळे पूर्ण बॉलीवूड मध्ये शोकाचे वातावरण पसरले आहे.

मुकुल देव याने सन ऑफ सरदार ,जय हो ,आर राजकुमार, यमला पगला दिवाना अशा सिनेमांमध्ये मोठी भूमिका निभावली आहे.तसेच पंजाबी बंगाली हिंदी चित्रपटांमध्ये व भूमिकांमध्ये काम केलेले आहे.

मुकुल देव याची आठ ते दहा दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे नवी दिल्ली येथे शांती पूर्णपणे 54 व्या वर्षी निधन झाले. असे त्यांचे भाऊ राहुल देव यांनी पी टी आई ला सांगितले की स्वास्थ खराब होऊन त्यांचे निधन झाले.
यांचा अंतिम संस्कार निजामुद्दीन पश्चिम दयानंद मुक्ती धाम शमशान घाटावर झाला. त्यावेळी त्यांच्या पूर्व पत्नी शिल्पा देव व मुलगी सिया देव उपस्थित होती.
अनेक बॉलीवूड अभिनेत्यांनी करत शोक व्यक्त केला त्यामध्ये मनोज वाजपायी, सोनू सूद ,हर्षद वारसी.

Exit mobile version